अण्णासाहेब मगर सहकारी बँक अध्यक्षांच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरु-सुभाष देशमुख

नागपूर : अण्णासाहेब मगर सहकारी बँक, भोसरी, जि.पुणे या बँकेसंदर्भात अध्यक्षांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत बँकेच्या सभासदांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी सुरु असून दोषींविरुद्ध जबाबदारी निश्चित करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.

सदस्य सुभाष साबणे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्यास उत्तर देताना सहकारमंत्री म्हणाले, लेखा परिक्षण अहवालातील गंभीर मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काळे यांनी भाग घेतला.