जीवाला धोका असल्याच्या कारणावरून इंद्रायणी मुखर्जीची सीबीआय कोठडीची मागणी

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीने आपल्या जीवाला कारागृहात धोका असल्यामुळे सुरक्षित कोठडीची मागणी केली आहे . नैराश्याच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन इंद्राणीने काही
दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर मागच्या शुक्रवारी तिच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु झाले. नागपाडा पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने त्यानंतर आता आपण भायखळ्याच्या जेलमध्ये सुरक्षित नसल्याचा आरोप करित इंद्राणीने आपली रवानगी सीबीआयच्या सुरक्षित कोठडीत करावी अशी मागणी केली आहे.