रुपया डॉलरच्या तुलनेत रसातळाला

नवी दिल्ली : भारतीय रुपया जानेवारी 2017 पासून तर आतापर्यंतच्या सर्वात जास्त वाईट अवस्थेत आहे. 68 रुपये प्रति डॉलर च्या मनोवैज्ञानिक आणि महत्वपूर्ण अंकापासून रुपया घसरला आहे. गुंतवणुकदार कर्नाटक निवडणुकीची वाट बघत होते. चलन अस्थिरता हे सर्वात मोठे कारण हे असू शकते. आता कर्नाटकमध्ये केंद्रातील सत्तारूढ भाजपाने सर्वात मोठा पक्ष होण्याचा करिश्मा तर करून दाखविला यात दुमत नाही. मात्र जादुच्या आकड्यापासून ते थोडेफार दूर राहिले. राजकीय नेतृत्वाशिवाय आणखी काही कारण जसे कच्च्या तेलाच्या उच्चस्तरावरील किमती, कर्जाची वसूली न होणे आणि घरगुती उद्योगांच्या कामगिरीत कमीपणा, हेसुद्धा रुपयाच्या अस्थिरतेसाठी मोठी कारणे मानल्या जात आहे.

दिवसभर डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण सुरुच होती. बाजार उघडण्यापूर्वी एका डॉलरची किंमत 68.14 रुपये होती. जेव्हा कि बाजार बंद होताना डॉलरची किंमत 68.11 होती. जेव्हाकि यापूर्वी रुपया 67.52 रुपयावर बंद झाला होता. बाजार विशेषज्ञ आणि मॅकलाई फायनांशियलचे सीईओ जमाल मॅकलाई मीडियाशी बोलताना म्हणाले, रुपयाची घसरण कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा सुरुवातीचा धक्का मात्र आहे. ज्या पद्धतीने कर्नाटक निवडणुकीच्या निकालामुळे संपूर्ण घटनाक्रमच बदलला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनिश्चिंततेला उत्तेजन दिले आहे.

जेव्हा कि, राजकारणामुळे दिवसभर अस्थिरता होती. मात्र भारतीय रुपयाला जागतिक आणि देशाच्या अंतर्गत सुरु असलेल्या चढउतारामुळेसुद्धा अनेक धक्के बसले. ज्यामध्ये सर्वात महत्वाचे आहे कच्च्या तेलाचे उच्चस्तरीय भाव. मोठ्या प्रमाणातील तेलाचे आयात भारताच्या सध्याच्या तोट्याला 2.3 टक्क्यापर्यंत वाढवू शकते. जेव्हा कि, मागील वर्षी हाच बाजाराचा तोटा सकल घरघुती उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे 1.9 टक्क्यापर्यंत होता. या बाबी एचएसबीसीच्या ग्लोबल रिसर्च रिपोर्टमध्ये नमूद केल्या आहे.

या दरम्यान देशातून प्रतिभा पलायन आणखी गतीमान झाले आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी यावर्षी भारतात सुमारे 22071 हजार कोटी रुपये विकले आहे. जर एकूण रुपयाची एक्झिट बघितली तर कर्ज आणि इक्विटी दोन्ही मिळून 17,096 कोटीची आहे. घरगुती बाजाराच्या या आकड्यांमुळे अमेरिकन डॉलरच्या व्यवहारात आणि जागतिक मुद्रा नितीमुळे बाजारात रुपयाची ही स्थिती झाली आहे. भारतीय रुपया सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 6.22 टक्के रसातळाला गेला आहे जेव्हा कि 2017 साली हाच रुपया आजच्या तुलनेत 6 टक्के वर गेला होता.