मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरपीआयचे पुण्यात रविवारी राज्यव्यापी अधिवेशन

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (दि. २७) प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) जवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर सायंकाळी ४ होईल.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीचे राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. युवक आघाडीचे महासचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, जिल्हा युवती अध्यक्ष प्रियदर्शिनी निकाळजे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण या वेळी उपस्थित होते.

यावेळी वेगवेगळ्या मुद्दांवर चर्चा करण्यात येणार असून यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षण, कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका, सुक्षित बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार बेकार भत्ता, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारक आदि विषयांचा समावेश आहे.