नागपुरात आग, विहीर व तलाव दुर्घटनेत 5 वर्षांत 438 जणांचा मृत्यू

नागपूर : शहरात लागलेल्या आग, विहीर व तलावातील दुर्घटनेत मागील पाच वर्षांत 428 लोकांचे बळी गेले असून यात 104 महिला आणि 324 पुरुषांचा समावेश आहे.

अग्निशमन विभागाच्या जवानांना शहर व ग्र्रामीण भागात आगीपासून १४६ कोटी ९४ लाखांची मालमत्ता आगीपासून वाचविण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
मागील वर्षभरात नागपूर शहरात लहानमोठ्या १३६० तर शहराबाहेर ४४ आगीच्या घटना घडल्या. शहरातील आगीच्या घटनात १८ कोटी ५७ लाख ३५ हजारांचे नुकसान झाले. तर ग्रामीण भागातील आगीच्या घटनात २२ कोटी ६७ लाख २१ हजार १५० रुपयांचे नुकसान झाले.

१४ एप्रिलला अग्निशमन सेवा दिवसाला देशभरात अग्निशमन विभागातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यानिमित्ताने महापालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सप्ताह पाळला जाणार आहे. असल्याची माहिती उचके यांनी दिली.

पाच वर्षांत शहर व ग्रामीण भागात ४,५९८ आगीच्या घटना घडल्या. यात २०१३-१४ या वर्षात ७१४, २०१४-१५ या वर्षात ८३४, २०१५-१६ या वर्षात ९२२, २०१६-१७ या वर्षात ११२४ तर २०१७-१८ या वर्षात १३६० आगीच्या घटना घडल्या.