कर्नाटकात मुस्लीम आणि लिंगायतांनी ही दिली भाजपला साथ

बेंगरूळू : निवडणुकीच्या आधी लिंगायत समाजाला अल्पसंख्यक समाजाचा दर्जा देऊन मतदारांना आकर्षित करण्याच्या कॉंग्रेसच्या खेळीवर अखेर पाणी फेरले आहे. कारण कर्नाटकमध्ये लिंगायत आणि मुस्लीम समाजाने काँग्रेसऐवजी भाजपला साथ दिली आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपची वरचढ पाहता हे स्पष्ट होत
आहे.

कर्नाटकाचा मोठा मतदार वर्ग असलेल्या लिंगायत समाजाची मतं वळविण्यासाठी काँग्रेसने लिंगायत समाजाला अल्पसंख्यक समाजाचा दर्जा दिला होता. त्यामुळे लिंगायत समाजाची मते काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण कॉंग्रेसच्या या सर्व प्रयत्नांवर अखेर पाणी फेरल्याचे कर्नाटकच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.