“जय महाराष्ट्र” मध्ये सुभाष देसाई आणि सुनील पोरवाल

Jay Maharashtra Program

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित “जय महाराष्ट्र” कार्यक्रमात उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक 15 मे 2018 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018, महिला उद्योग धोरण, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी प्रोत्साहन योजना, औद्योगिक क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम, औद्योगिक वापरासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनी विनाधिसूचित करण्याबाबतची वस्तुस्थिती, विदर्भ, मराठवाडा विकास योजना, राज्य परकीय गुंतवणुकीचे रोजगार निर्मितीवर पडणारे प्रभाव, कुशल मनुष्यबळ निर्मिती, उद्योगवाढीसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, विमानतळ जाळ्यांचे विकास, स्टार्ट-अप साठी विशेष योजना आदी विषयांची माहिती तसेच उपस्थित असलेल्या उद्योजकांच्या प्रश्नांची उत्तरे देसाई व पोरवाल यांनी “जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून दिली आहेत.