डिग्री डॉक्टर, इंजिनीअरची आणि व्हायचे आहे पोलीस कॉन्स्टेबल !

मुंबई : आता याला बेरोजगारी म्हणा किंवा स्वतःच्या कार्यक्षमते बद्धल असलेला संभ्रम ! पण देशातल्या तरुण पिढीचे हे चित्र भल्या भल्यांना विचार करायला भाग पाडणारे आहे. याचे कारण ही तसेच आहे. मुंबई पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळावी यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले असून यामध्ये चक्क डॉक्टर, इंजिनीअर व एमबीए सारख्या उच्चशिक्षितांचाही समावेश आहे.

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी आहे. तर, या पदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त पदवीधारक आहेत आणि तीन हजारांपेक्षा जास्त पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. यामध्ये तीन डॉक्टर, पाच वकिल, १६७ एमबीए व ४२३ इंजिनीअर बेरोजगारीला कंटाळून हातात चक्क कॉन्स्टेबलची काठी पकडायला तयार झाले आहे. लोकसंखेचा भस्मासुर असलेल्या देशात अशी परिस्थिती येणे एका अर्थी साहजिकच आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.