पालघर, ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : यावर्षी राज्यभरात पावसाने सगळीकडेच जोरदार हजेरी लावली असून सध्याच्या हवामान परिस्थितिनुसार पालघर आणि ठाण्याला मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या कालावधीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या सारी काही ठिकाणी कोसळण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. शुक्रवार जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार मंगळवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस आहे. पश्चिम महाराष्ट्रालाही या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गुरुवारी मध्यरात्रीपासून उपनगरांमध्ये थोड्या थोड्या वेळाने जोरदार पाऊस पडत आहे. दुपारीदेखील आशिष परिस्थिती कायम होती. तर एखादीच पाच-दहा मिनिटांची मोठी सर मुंबईकरांना भिजवून गेली. शुक्रवार सकाळी ८:३० ते रात्री ८:३० पर्यंत कुलाबा येथे ३ मिलीलीटर तर सांताक्रूझ येथे १२.२ मिलीलीटर पावसाची नोंद झाली.