… त्याच्याजवळ ११६ आमदार आहेत; मुख्यमंत्री पदावर करतो आहे दावा !

- वाट्सऐप संदेशने गंभीर वातावरणात उडाले हास्याचे फवारे

नई दिल्‍ली : कर्नाटकमधे जास्त आमदार (बहुमत) कोणाकडे आहे या राजकीय वितंडवादावर १८ मे रोजी काँग्रेस आणि भाजपाचे वकील पोटतिडकीने युक्तिवाद करून आपल्याच पक्षाकडे बहुमत असल्याचा दावा करत होते. वातावरण एकदम गम्भीर होते.

थोडी उसंत मिळताच जस्टिस सिकरी म्हणाले, मला एक वाट्सऐप संदेश आला आहे. या हॉटेलचा मालक म्हणतो आहे की माझ्याकडे ११६ आमदार आहेत, मला मुख्यमंत्री करा!

जस्टिस सिकरी यांचा संदेश ऐकून सर्वांना जोरदार हसू आले. न्यायालयातलं गम्भीर वातावरण एकदम निवळले. काही वेळ सगळे तणावमुक्त झाले.

जस्टिस सिकरी यांच्या संदेशाचा संदर्भ बेंगलुरुच्या ईगलटन रिसॉर्टशी होता. कांग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना १७ मे रोजी रात्री याच रिसॉर्टमध्ये ठेवले होते. काल येदियुरप्‍पा यांनी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानन्तर या आमदारांना हैदराबाद येथे हलवण्यात आले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बहुमतावरून भाजपा आणि काँग्रेसमधे सुरू असलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांवरून सोशल मीडियावर भरपूर विनोद सुरू आहेत.

एकूण काय तर राजकारणाचा कचरा झाला आहे.