हरेन पंड्या हत्याकांडातील आरोपी पाकिस्तान मध्ये मोकाट

- खोटे कागदपत्र तयार करून घेतले ताब्यात

मुंबई : भाजपाचे नेते हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी फारुक देवाडीवाला याला दुबई पोलिसांनी भारतीय गुप्तचारांनी दिलेल्या माहितीवरून अटक केली. पण, पाकिस्तानने खोटे कागदपत्र तयार करून, तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे दुबई पोलिसांना पटून दिले आणि त्याब्यात घेतले.

कारण, भारताच्या ताब्यात आल्यानंतर देवाडीवालाने त्याच्या गुन्हांची कबुली दिली असती तर पाकिस्तान सरकार समर्थित दहशतवादाचा चेहरा जगासमोर उघड झाला असता.

सध्या देवाडीवाला आणि त्याचा एक सोबती पाकिस्तानमध्ये मोकाट फिरत आहेत.

उल्लेखनीय आहे की हरेन पांड्या यांची सुमारे पंधरा वर्षांपूर्वी हत्या झाली. फारुक देवाडीवाला या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे तो दाऊदचा उजवा हात मानला जातो
मुंबई नुकतीच एटीएसनं दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत देवाडीवालाने पाकिस्तानात दहशतवादी कृत्यासाठी प्रशिक्षण घेतल्याची माहिती मिळाली होती.

देवाडीवाला दुबईत असल्याने भारताच्या पोलिसांनी ती माहिती दुबई पोलिसांना दिली आणि त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. पण पाकिस्तानने खोटी कागदपत्र तयार करून दुबई पोलिसांना देवाडीवाला पाकिस्तानी नागरिक असल्याचे पटवून दिले आणि ताब्यात घेऊन मोकाट सोडले.