लवकरच होणार दिल्ली- मुंबई नवीन एक्स्प्रेस वे !

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या नवीन एक्स्प्रेस वे तयार करण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक वमहामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका कार्यक्रमात केली. या प्रास्ताविक प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेला जोडणारा चंबळ एक्स्प्रेस वे बांधण्याचीही
योजना असून या मार्गाचा मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांना फायदा होईल, असे गडकरी यांनी जाहीर केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणिमहामार्ग मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. नवीन दिल्लीमुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल आणि तुलनेने कमी विकसित असलेल्या प्रदेशातून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी याआधी दिली होती. हामार्ग नेमका कोणत्या भागातून जाईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.सध्याच्या महामार्गांच्या विस्तारीकरणाऐवजी नवीन रस्ते बांधण्यावरसरकारचा भर असून तुलनेते कमी विकसित भागातून जात असल्याने भूसंपादनाचा खर्च कमी असतो, अशी भूमिका यामागे आहे.