आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी केले लेझीम नृत्य

जळगाव : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील सामील झाले होते. जामनेर
शहरात जयभीम नगरातून निघालेल्या मिरवणुकीत खास निळा शर्ट परिधान करुनमोठ्या उत्साहात गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचत होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेपूजन करुन उपस्थितांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या. गिरीश महाजन हे गेल्या२५ वर्षांपासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणु कीमध्ये सहभागी होत आहेत. यामिरवणुकीमध्ये ते केवळ सहभागीच होत नाही तर लेझीमच्या तालावर सबंध मिरवणूकभर नाचत देखील असतात. राज्याचे जलसंपदा मंत्री हे पद मिळाल्यावरदेखील त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली आहे.