जॅकी श्रॉफच्या पत्नीची चार तास चौकशी

मुंबई: जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याप्रकरणी तिची चार तास चौकशी करण्यात आली. याप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तथापि, गुन्हे शाखेने याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

ठाणे पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. जॅकीची पत्नी आयेशा हिने तिचा बिझनेस पार्टनर व बॉयफ्रेंड अभिनेता साहील खान याच्या क्रमांकाचा CDR काढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यात अॅड. रिजवान सिद्दीकी याचाही समावेश आहे. रिजवान याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने आयेशाने साहील खानचा सीडीआर काढल्याचे चौकशीत सांगितले होते. त्यामुळे ठाणे युनिटच्या गुन्हे शाखेच्या रडारवर आयेशा आली आहे.