पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अटक

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना लंडनमधील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवत लाहोर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची ही कारवाई केली. अबूधाबीहून त्यांना घेऊन आलेले इतिहाद एअरवेजचे विमानाने लाहोर विमानतळावर लँड केल्यानंतर त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती.

नवाज यांच्या अटकेआधी पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला आहे. लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने विमानतळ परिसरात जमले आहेत. लाहोरमध्ये शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमकी सुरु आहेत. पाच पोलीस जखमी झाले आहेत. ३७८ जणांना अटक करण्यात आली आहे. लाहोरला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

आज सकाळी नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियन लंडनहून अबूधाबी येथे पोहोचले. तिथे काही काळ विश्रांती केल्यानंतर संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पाकिस्तानला रवाना झाले होते. एएनबीने शरीफ यांच्या अटकेची पूर्ण तयारी केली होती.