पत्नी व मुलीच्या हत्येनंतर स्वत:ची आत्महत्या

नागपूर : अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीला विष पाजले, नंतर त्यांना फासावर लटकावून पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत आर्वी येथील आष्टी (शहीद) येथील रहिवासी असल्याचे समजते. अनिल नारायण वानखडे (वय-37),पत्नी स्वाती अनिल वानखडे (वय- 32), मुलगी आस्था (वय- दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेली माहितीनुसार अनिल याने त्याच्या वडिलांसोबत झालेल्या वादामुळे काल (ता.12) सायंकाळी सात वाजता पत्नी स्वाती आणि मुलगी आस्था हिला घेऊन घराबाहेर पडले. अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात अनिल यांनी पत्नी आणि मुलीला विष पाजले. नंतर दोघींना झाडाला दोरी बांधून त्यांना फाशी लावली. नंतर अनिल यांनी स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहे.