कर्नाटकात काँग्रेसचे ईव्‍हीएमवर खापर

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसचा पराभव झाल्‍यानंतर काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी ईव्‍हीएमवर प्रश्‍न उपस्‍थित केला आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्‍यानंतर काही तासातंच भाजपचे चित्र स्‍पष्‍ट झाले.

मोहन प्रकाश म्‍हणाले, ‘मी पहिल्‍या दिवसांपासून म्‍हणत आहे की, ईव्‍हीएमवर आक्षेप न घेणारा असा देशात कोणताही पक्ष नाही. प्रत्‍येक पक्षाने ईव्‍हीएमवर संशय घेतला आहे. याआधी भाजपनेदेखील ईव्‍हीएमवर आक्षेप घेतला आहे. आता सर्वच पक्ष ईव्‍हीएमवर प्रश्‍न उपस्‍थित करत आहेत. तर भाजपला मतदान पत्रिकेद्‍वारे निवडणुका घेण्‍यात काय समस्‍या आहे?’

कर्नाटकातील आजचे चित्र पाहता आतापर्यंत चार राज्यांमध्ये आपले अस्तित्व टिकून ठेवलेल्या काँग्रेसची आता केवळ तीनच राज्यात सत्ता उरली आहे. मिझोराम, पंजाब आणि पुदुचेरी या तीन राज्‍यांतच काँग्रेसची सत्ता उरली आहे.