अमेझॉन नंतर फ्लिपकार्टचे ‘बिग शॉपींग डे’ जाहीर…मिळवा आकर्षक डिस्काऊंट

flipkart

अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलने १६ जुलैपासून ‘अमेझॉन प्राईम डे’ हा सेल जाहीर केला आहे. यात ग्राहकांना विविध उत्पादनांवर सवलती देण्यात येणार आहेत. यासोबत कॅश डिस्काऊंट, काँबो ऑफर्स आदीही जाहीर करण्यात आले आहे. या सेलच्या दरम्यान, अनेक प्रॉडक्टचे लाँचींग होणार आहे. यामुळे अमेझॉन प्राईम डे सेल हा अनेक युजर्सच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत अमेझॉनची प्रतिस्पर्धी कंपनी असणार्‍या फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलनेही ‘बिग शॉपींग डे’ या नावाने सेल जाहीर केला आहे. हा सेल १६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपासून सुरू होणार असून पुढील ८० तासांपर्यंत खुला राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. अर्थात १९ जुलैपर्यंत हा सेल राहणार आहे. अमेझॉनचा सेल हा फक्त ३६ तासांसाठी असून तो आधी संपणार आहे. यामुळे फ्लिपकार्ट पोर्टलवरील सेल हा जास्त काळ चालणारा असेल हे स्पष्ट झाले आहे.

flipkart

आपल्या या सेलमध्ये नेमक्या कोणत्या प्रॉडक्टवर किती सवलत मिळेल याबाबत फ्लिपकार्ट कंपनीतर्फे फारशी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, यात दर आठ तासांनी नवनवीन डील्स जाहीर करण्यात येतील असे संकेत मिळाले आहेत. यामुळे एकाच वेळी सवलती जाहीर करण्यापेक्षा यात आठ तासांनी नवीन सवलती देण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय, याच्या दरम्यान ‘रश अवर सेल’देखील सादर करण्यात येणार आहेत. या सेलच्या दरम्यान, एसबीआयच्या कार्डवरून खरेदी करणार्‍या ग्राहकांना विशेष सवलत मिळण्याचे संकेत आहेत. तथापि, याबाबतही नेमकी किती सवलत मिळणार हे जाहीर झालेले नाही. फ्लिपकार्ट कंपनीच्या सेलमध्ये विविध उपकरणांवर घसघशीत सवलती मिळणार आहेत. यामध्ये विवो, गुगल पिक्सेल, सॅमसंग, असुस आदी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश असणार आहे. याशिवाय टिव्ही, फ्रीज, वायरलेस हेडफोन्स, पॉवर बँक्स, लॅपटॉप, टॅबलेट, फिटनेस ट्रॅकर, ब्ल्यु-टुथ स्पीकर्स आदींवरही आकर्षक सवलती मिळण्याची शक्यता आहे.