भाजपच्या राज्य कार्यकारिणीची पहिल्यांदा श्रीनगरमध्ये बैठक : काश्मीर मुद्दावर कोंडी फुटण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितले कि, भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक श्रीनगर येथे होत असून काश्मीरची कोंडी फोडण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरेल. काही दिवसांपूर्वी इंटलीजन्स ब्युरोचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची त्रयस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्धावर मदत होईल. त्रयस्त शर्मा राज्यातील दावेदारांसोबत चर्चा करणार असून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यच्या दिशेने हे योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले.

डॉ सिंग एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्रयस्त दिनेश्वर शर्मा म्हणाले होते, कि केंद्र सरकारने जो माझ्यावर विश्वास दर्शविला आहे. त्यासाठी मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल. आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. ते पुढे म्हणाले कि जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत कायम तोडगा काढणे ही माझी प्राथमिकता राहील. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीसुद्धा सरकारच्या या प्रयत्नाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे मुफ्ती यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

शर्मा यांची विश्वासर्हता आणि पूर्वीचे कार्याबाबत मुख्यमंत्री म्हणाल्या ते फार चांगले व्यक्ती असून त्यांची विश्वासर्हता चांगली आहे. त्यांनी उत्तर-पूर्वभागातील चर्चेतही भाग घेतला होता. ही एक चांगली सुरुवात असून आम्ही केंद्र सरकारच्या या पावलाचे स्वागत करतो.