उपहाराआधी शतक : शिखर पहिला भारतीय फलंदाज

बंगळुरु : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात शिखर धवनने उपहारापूर्वी शतक झळकवण्याचा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये उपहाराआधीच शतक झळकावणारा शिखर धवन पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याच्या या खेळीमध्ये १९ चौकार आणि ३ षटकार आहेत .

याआधी ५ खेळाडूंनी हा व विक्रम केला आहे. शिखरने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहारापर्यंत १५८ धावांपर्यंत मजल मारली होती.

कसोटीत उपहारापूर्वी शतक झळकवणारे विक्रमवीर :
१) व्हिक्टर ट्रम्पर, मँचेस्टर (१९०२)
२) चार्ली मॅकार्टनी, लीड्स (१९२६)
३) डॉन ब्रॅडमन, लीड्स (१९३०)
४) माजिद खान, कराची (१९७६)
५) डेव्हिड वॉर्नर, सिडनी (२०१७)
६) शिखर धवन, बेंगळूर (२०१८)