मोबाईलच्या बॅटरीच्या स्फोटामुळे मुलाच्या हाताची बोटे तुटली

जालना:आई-वडिल घरी नसताना दुपारच्या वेळी मुलांनी खेळण्यात असलेली मोबाईलची बॅटरी फोडण्याचा प्रयत्न केला असता बॅटरीचा स्फोट होईन दहा वर्षाच्या मुलाची हाताची बोटे तुटल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव इथे घडली.

राठोड असे जखमी झालेल्या मुलाले नाव असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत माहिती अशी, आई-वडिल घरी नसताना दुपारच्या वेळी उमेश राठोड आपल्या लहान भावासोबत खेळत होता. मुलांनी खेळण्यात असलेली मोबाईलची बॅटरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बॅटरीचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये मोठा मुलगा उमेशच्या हाताची बोटे अक्षरश: तुटली, त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे.