संभाजी भिडेंवर आचारसहिंता भंग केल्याचा गुन्हा दाखल

बेळगाव : श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर गुरुवारी झालेल्या सभेत प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेवत बेळगाव पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलीस आयुक्तालयाने ही कारवाई केली. या सभेत भिडे यांनी केलेली विधाने आचारसंहितेच्या जाळ्यात अडकली आहेत. संभाजी भिडे हे गुरुवारी येळ्ळूर येथे महाराष्ट्र मैदानात झालेल्या कुस्त्यांना उपस्थित होते.
‘विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना बहुमताने  विजयी करा. कुस्ती मैदानाच्या विरोधातील व्यक्तींना त्यांची जागा दाखवून द्या. आजवर अनेक कुस्त्यांची मैदाने पाहिली पण येळ्ळूरच्या मैदानासारखे कुस्ती मैदान कोठेही पाहिले नाही.’ असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले होते. संभाजी भिंडेंच्या या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.