मुंबईत खड्ड्याचा पाचवा बळी, बाईक आदळली अन् ट्रकने तरुणाला चिरडले

मुंबई:  गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून कल्पेश जाधव नावाचा तरूण मुंबईतील खड्यांचा पाचवा बळी ठरला आहे.खड्ड्यात दुचाकी आदळल्यानंतर मागून आलेल्या भरधाव ट्रकखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये झाली आहे.

तो बाईकवरुन चालला होता. गांधारी पूलाजवळ त्यांची बाईक खड्ड्‍यात गेली. तो रस्त्यावर पडला. मागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तो कल्याणजवळीळ एका गावात राहात होता.

गेल्या आठवड्यात खड्डा चुकवताना बाईक घसरुन ट्रकखाली आल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत.