फिफा वर्ल्डकप २०१८ चा दिमाखदार सोहळ्याने रशियात शुभारंभ

मॉस्को : ८० हजार आसनक्षमता असलेल्या मॉस्कोतील देखण्या लुझ्निकी स्टेडियमवर आज फिफा वर्ल्डकप २०१८ चा दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ झाला. यंदाच्या वर्ल्डकपसाठी बनवण्यात आलेले ‘लिव्ह इट अप’ हे गाणे सगळ्यात सुरुवातीला वाजले आणि नंतर अर्धा तास रंगारंग सोहळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

ब्रिटनचा रॉकस्टार रॉबी विल्यम्स तसेच रशियन गायिका एडा गरिफुलिना यांच्या सादरीकरणानंतर फुटबॉल घेऊन मैदानात उतरलेली मॉडेल व्हिक्टोरिया लोपरे हिच्या फुटबॉलला ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डोने किक मारली आणि वर्ल्डकपच्या महाकुंभाला सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी वर्ल्डकपचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली.

यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीची लढत सुरू झाली असून रशियाने २-० अशी आघाडी घेत पूर्वार्धात आपले वर्चस्व राखले आहे.