हप्ता मागणीला कंटाळून शेतक-यांनी भाज्या मंत्रालयासमोर फेकल्या

मुंबई : बोरीवरीतील नियमित बाजारामध्ये भाज्या विकणा-या शेतक-यांना पोलिस आणि मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी सत्त हप्ता मागत असल्याने कंटाळून अखेर या शेतक-यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भाज्या फेकून आंदोलन केले.

उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील हे शेतकरी बोरीवलीमध्ये नियमीत भाज्या विकत असतात. पण त्यांना तिथे नियमीत पोलिस आणि बिएमसीच्या आधिकाऱ्यांचा त्रास होतो. सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर भाज्या टाकून आपला राग व्यक्त केला.

बोरीवलीमधून त्यांनी कॅरेटमध्ये भाज्या भरून आणल्या होत्या. यामध्ये मिरची, बटाटा, कांदा, लसून आणि कोथिंबीरीसारख्या भाज्या शेतातील उत्पादने होती. कॅरेटच्या कॅरेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टाकून आंदोलन केले.