आंबेगाव तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

मंचर : येथील 85 वर्षीय शेतक-याने विषारी द्रव प्राशन करून आज आत्महत्या केली. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील या शेतक-याचे नाव. दगडु नारायण पोखरकर असे आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे घराजवळील शेतात सुरेश पोखरकर पाणी भरण्यासाठी गेले होते.पाणी भरून घरी आल्यावर दुध काढुन गावात दुध वाटप करून घरी आलो असता सकाळी ६ च्या सुमारास वडील दगडु पोखरकर यांना झोपेतुन उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते उठले नाही.

माझी पत्नी मनिषा उठवण्यास गेली असता दगडु पोखरकर यांच्या तोडातुन फेस येत असल्याचे तिने मला सांगितले.त्यावेळी त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती.त्यांच्या तोंडाचा उग्र वास येत होता.म्हणुन दगडु पोखरकर यांना मंचर उपजिल्हा रूग्णालयात सकाळी साडेसहा वाजता आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन पाहिले असता त्यांचा वैद्यकीय उपचाराआधीच मृत्यु झाल्याचे घोषीत केले.

याबाबत पिपळगाव खडकी येथील दगडु पोखरकर यांचा मुलगा सुरेश पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.