सदाभाऊ खोत यांच्या सूचनेने शेतक-यांच्या हरभ-याची विक्री

शिरूर अनंतपाळ (लातूर ) : तालुक्यातील तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचनाजिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास दिल्यामुळे अखेर त्या शेतकऱ्याचा १५० क्विंटल हरभरा आज खरेदी करण्यात आला आहे. परिणामी त्याच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला असल्याने या शेतकरी कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे.

हरभऱ्याची हमीभावात विक्री करून मुलीचा विवाह पार पाडता येईल, या विचाराने त्यानी हरभऱ्याची विक्रीसाठी आँनलाईन नोंदणी केली आणि मुलीच्या विवाहाची २४ एप्रील ही तारीख काढली होती. परंतु हरभऱ्याची विक्री झालीच नाही त्यामुळे तालुक्यातील तळेगाव( बो ) येथील भागवत एकुर्गे याना आपल्या मुलीच्या विवाहाची तारीख बदलून १२ मे काढावी लागली
या शेतकऱ्यास यंदाच्या रबी हंगामात एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीनीत जवळपास २०० कट्टे हरभरे झाले .

राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल मोरे ,जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या माध्यमातुन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास सदर शेतकऱ्याचा हरभरा तात्काळ हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भागवत एकुर्गे यांचा एकंदर १५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे.