एमेडियोचे न्यूड महिलेचे पेंटिग विकले गेले 10 अब्ज 60 कोटीत

न्यूयॉर्क : सुप्रसिद्ध चित्रकार एमेडियो मोदीग्लियानी ने 1917 साली काढलेले न्यूड महिलेचे एक पेटिंग आर्ट डीलर कंपनी सोथबे ने आयोजित केलेल्या लिलावात 157 मिलियन डॉलर अर्थात 10 अब्ज 60 कोटी रुपयांत विकल्या गेले.

वृत्तानुसार सोथबेच्या 274 वर्षाच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे कि एवढ्या मोठ्या किंमतीत एवढे महाग पेंटिंग विकल्या गेले. उल्लेखनीय आहे कि एमेडियो मोदीग्लियानी (Amedeo Modigliani) यांनी 1917 साली ही पेंटिंग तयार केली होती. यात एक महिला विना वस्त्रांची पाठीचा आधार घेऊन झोपलेली आहे. ही पेंटिग अनेकवेळा प्रदर्शनात ठेवली गेली आहे. नुकत्याच न्यूयॉर्क येथे प्रदर्शनात ही पेंटिंग 10 अब्ज 60 कोटी रुपयांत विकली गेली आहे.

आर्ट डीलर कंपनी सोथबेने या पेंटिंगचा लिलाव आयोजित केला होता. यातील 13 पेंटिंगला कुठलाही बोलीदार मिळाला नाही. बोली लावणारा मिळणा-या पेंटिगमध्ये पिकासो यांच्याशिवाय हेनरी मोरे आणि मार्क चैगल यांच्या पेंटिगचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे कि, 10.6 अब्ज रुपयांत लिलाव झालेल्या या नग्न महिलेच्या या पेंटिंगला सर्वात आधी 2003 मध्ये 2.69 डॉलरमध्ये विकल्या गेले.

15 वर्षानंतर या पेंटिगची किंमत 6 पटीने वाढली. सर्वात महागड्या पेंटिंगच्या बाबतीत बोलायचे झाल्यास लियोनार्डो द विंची ची साल्वेटर मुंडी (Salvator Mundi) जी 45.3 कोटी डॉलरमध्ये विकल्या गेली होती. या लिलावात सुप्रसिद्ध चित्रकार पिकासो यांची न्यूड मुलीची पेंटिंगची 1.15 कोटी डॉलरमध्ये लिलाव झाला होता.या पेटिंगमध्ये मुलीच्या हातात फूल आहे.

उल्लेखनीय आहे कि एमोडिओ मूळात इटलीचे होते. त्यांना पेंटिगची आवड होती. त्यांनी पेटिंगला नवी दिशा देण्यासाठी पुष्कळ काम केले. त्यांच्या ख्यातीचा अंदाज एवढ्यावरच लावल्या जाऊ शकते कि, त्यांची पेंटिग आता जगातील सर्वात मोठ्या म्युझियमध्ये आहे. फक्त 35 वर्षाच्या वयात या सुप्रसिद्ध चित्रकाराचे निधन झाले.