देशात व्यवसाय सुलभ करणे आता चिंतेची बाब : सुनील मित्तल

Sunil Mittal

मुंबई: देशातील सर्वात मोठी कंपनी भारती एयरटेलचे मालक सुनील मित्तल यांनी देशातील व्यवसायाला सुलभ करणे आता चिंतेची बाब असल्याचे सांगत सरकारला औद्ययोगिक क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही असे वाटते की उदयॊग क्षेत्राचा रँक सुधारावा.

एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात मित्तल हे कार्यक्रमात सामूहिक परिचर्चेत बोलत होते. यावेळी सोहळ्यात वित्तमंत्री अरुण जेठलीही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. घाना येथे विलय मंजुरी तीन दिवसात मिळाल्याची माहितीही आश्चर्यचकित करणारी आहे. मित्तल यांनी कोणत्या पूर्व स्वामित्व वाली कंपनीला आपल्या प्रवर्तक कंपनीत विलयबद्दल सांगितले की, देशात आवश्यक मंजुरी मिळण्याकरिता ५ वर्षे लागतात . यावर त्यांनी आपले मत मांडत एक मंत्रीस्तरीय समिती असायला हवी जी उद्योग क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय देईल आणि त्याची अंबलबजावणीही करेल. त्यांनी बँकामध्ये २. ११ लाख रुपये रक्कम देण्याच्या योजनेची स्तुतीही केली.

यामुळे बँकांनाही दिलासा मिळाला आहे . त्यांनी चालू वर्षाच्या गुंतवणुकीवर दुपट्टीने वाढ होणार असल्याचे संकेतही दिले. यावरून येत्या तीन वर्षात कंपनी ७५ हजार कोटी गुंतवणूक करेल. उल्लेखनीय म्हणजे , जागतिक बँकद्वारा व्यवसायाच्या सुलभतेनुसार तयार करण्यात आलेल्या अहवालात १९० देशातून भारत हेब १३० व्या क्रमांकावर आहे.