इंग्रजी बोलता येत नसल्याने झालेल्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : इंग्रजी बोलता येत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियोची माहिती लग्नाचेवेळी दिली नसल्याच आरोप सासरच्या मंडळीने केला होता.ही घटना वाकड येथे गुरुवारी ( दि. १२ जुलै ) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.

सारिका उर्फ प्रतिक्षा गणेश डांगे पाटील (वय २०, रा. समता कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गणेश रमेश डांगे पाटील (वय २६), सासू सुरेखा रमेश डांगे पाटील (वय ४५ दोघेही रा. समता कॉलनी, श्रीनगर, रहाटणी), दिपाली चंद्रकांत डिडवळ (वय ३५), चंद्रकांत बाबासाहेब डिडवळ (वय ३८, दोघेही रा. गुलमोहर कॉलनी, रहटाणी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काम येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही, शस्त्रक्रिया केल्याबाबतची माहिती लग्नाच्यावेळी सांगितले नाही. या कारणावरुन पती, सासू, नणंद, नंदावा हे सारिका यांचा छळ करत होते. या त्रासाला कंटाळून सारिका यांनी राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. याप्रकरणी रविंद्र राजाभाऊ गलांडे (वय २१, रा. मु. पो. यळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.