पित्याच्या ‘सेक्युलर’ प्रतिमेला धक्का लागल्याने काँग्रेससोबत युती : कुमारस्वामी

बंगळुरु : मला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून ऑफर मिळाली होती. परंतु 2004 आणि 2005 मध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे माझे वडील एचडी देवेगौडा यांचच्या राजकीय कारकीर्दीवर डाग लागला होता. आता देवाने तो डाग हटवण्यासाठी संधी दिली आहे. यामुळे मी काँग्रेससोबत हात मिळवणी केल्याचे काँग्रेससोबत हात मिळवणाऱ्या जेडीएसच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्‍वामी यांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्ये त्रिशंकु स्थिती तयार झाल्यानंतर सत्ता संघर्ष पाहायला मिळतो आहे.

कुमारस्‍वामीमुळे त्यांच्या ‘सेक्‍युलर’ प्रतिमेला धक्का बसला होता. कारण मुलाने भाजपसोबत युती करुन 2004 आणि 2005 मध्ये सत्‍ता मिळवली. त्याचे नुकसान पक्षाला झाले. 10 वर्ष पक्ष सत्तेतून बाहेर राहिला. देवेगौडा यांनी निकालाआधी म्हटले होते की, जर कुमारस्‍वामी भाजपसोबत युती करेल तर ते त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकतील.’ यामुळेच कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.