ड्रोणने पिकांवर फवारणी

आयआयटी बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केले प्रात्याक्षिक

दिल्ली : आयआयटी बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील कृषी भवनमध्ये देशपातळीवरील कृषी अधिकाऱ्यांसमोर ड्रोणने पिकांवर फवारणीचे प्रात्याक्षिक सादर केले.

याबाबत माहिती देतांना एका अधिकाऱ्याने सांगितले की १५ लिटर कीटनाशक घेऊन हे ड्रोण १२ फूट उंच उडते आणि ५ मिनिटात १ हेक्‍टरमधे फवारणी करते!पिकांवरच्या फवारणी चाचणीसाठी कृषी विभाग काही ड्रोण विकत घेणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर हे ड्रोण उपलब्ध राहतील. शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी करुन याची चाचणी घेण्यात येईल. महाराष्ट्रात येत्या हंगामात ड्रोनव्दारे फवारणीची उपयोगिता तपासली जाईल .

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, गेल्या हंगामात फवारणी दरम्यान विषबाधा होऊन विदर्भात ५० पेक्षा अधिक शेतकरी- शेतमजुरांचा जीव गेला होता. एका यवतमाळ जिल्हयात २२ पेक्षा जास्त जणांचा यात बळी गेला आहे.