डॉ. विनायक निपुण औरंगाबादचे नवे मनपा आयुक्त

औरंगाबाद : डॉ. विनायक निपुण यांनी काल औरंगाबादचे नवीन मनपा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. औरंगाबाद येथील मनपा आयुक्त हे पद मागील तीन महिन्यांपासून रिक्त होते. १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर मिटमिटा येथे कचरा टाकण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शविला होता.

पोलीस विरुद्ध नागरिक अशी दंगलही भडकली होती. दंगलीनंतर राज्य शासनाने आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली केली होती. दंगलीस कारणीभूत ठरवून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते, तेव्हा पासून औरंगाबादचे मनपा आयुक्त पद रिक्तच होते. आता या पदी डॉ. विनायक निपुण यांना नियुक्त करण्यात आले आहे.