खंडीत वीजपुरवठ्याबाबत महावितरणच्या अभियंत्यांशी चर्चा !

वाशिम : थकीत बीजबीलाकरीता करण्यात येत असलेल्या खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आमदार अमित झनक यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांशी मंगळवारी चर्चा केली. तसेच यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

खरिप हंगामातील उणीव भरून काढण्यासाठी आता रब्बी हंगामावर शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, थकित बिलापोटी आता शेतकºयांना महावितरणचा ‘शॉक’ बसत आहे. आर्थिक अडचणींमुळे थकित देयकाचा भरणा तातडीने आताच करणे शक्य नसल्याचे काही शेतकºयांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जऊळका रेल्वे, बेलखेडा किन्हीराजा, खेर्डा परिसरातील अनेक शेतकºयांनी आमदार अमित झनक यांच्याकडे समस्या मांडली. याची दखल घेत झनक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांच्यासमोर शेतकºयांच्या व्यथा मांडल्या.

थकित शेतकºयांनी १५०० ते २००० रुपयांदरम्यान देयकाचा भरणा केला आणि उर्वरीत रक्कम टप्प्याटप्प्याने अदा केली तर कृषीपंप पुरवठा खंडित करू नये, असे ठरविण्यात आले. शेतकºयांच्या व्यथा जाणून सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी झनक यांनी केली. सुरूवातीला १५०० ते दोन हजार रुपयादरम्यान देयकाचा केल्यानंतर कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याची ग्वाही महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता तायडे, पं.स. सभापती गजानन भोने, बबन पाटील गारडे, काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष बाजड यांच्यासह १०० ते १५० शेतकºयांची उपस्थिती होती.