राज्याच्या विधिमंडळातील चर्चा देशात उच्च दर्जाची- मुख्यमंत्री

नागपूर: राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी हा विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडतो. सामान्य जनतेच्य जीवनाशी निगडीत असलेले हे प्रश्न सखोलअभ्यासाअंती सभागृहात चर्चेला येतात. या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात अतिशय सकारात्मक चर्चा होते, किंबहुना ही चर्चा देशात उच्च दर्जाचीअसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे

केले. लोकमत विधिमंडळ पुरस्कार वितरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, वित्तमंत्री सुधीरमुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जयंत पाटील, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, ॲड. उज्ज्वल निकम आदीउपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि कायद्याचे संरक्षण देण्यासाठी विधिमंडळ सातत्याने सुरू असते. मात्रसभागृहातील तहकुब किंवा गोंधळाच्याच चर्चा अधिक होतात.

अनेकदा सभागृह हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अव्याहतपणे सुरू असते, याची माध्यमे कधीहीदखल

घेत नाहीत. राज्याच्या राजकारणात सशक्त लोकशाही दिसून येते. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्या मैत्री असली तरी सभागृहात राज्याच्या विकास आणिकायद्याबाबत सखोल आणि विश्लेषणात्मक चर्चा दिसून येते.

यावर्षीच्या लोकमत विधिमंडळ पुरस्कारात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विधान परिषदेतील उत्कृष्ट महिला आमदार विद्या चव्हाण, विधानसभेतील उत्कृष्ट महिला

आमदार यशोमतीठाकूर, विधान परिषदेतील उत्कृष्ट नवोदित आमदार अनिल सोले, विधानसभेतील

उत्कृष्ट नवोदित आमदार सुनील प्रभू, विधान परिषदेतील अभ्यासू आमदार संजय दत्त, विधानसभेतील अभ्यासू आमदाराचा पुरस्कार ॲड. आशिष शेलार यांना देण्यात आला.