अखेर दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ चित्रपट होणार प्रदर्शित 

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ मराठी चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘न्यूड’ला गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात नकार देखील करण्यात आला होता. त्यामुळे हा चित्रपट फारच चर्चेत होता. तसेच, या चित्रपटाच्या नावावरून आणि त्याच्या विषयावरूनही खूप चर्चा सुरु होती.

यादरम्यान, ‘न्यूड’च्या प्रदर्शनाविषयी जाहीर झाल्यानंतर जयपूरच्या लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी त्यांच्या ‘कालिंदी’ या कादंबरीची कथा चोरल्याचा आरोप दिग्दर्शक रवी जाधववर यांच्यावर केला होता. त्यांनतर पुन्हा वाद निर्माण झाला असून, न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली होती. मात्र, आता सगळे अडथळे पार करत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने रवी जाधव यांना आदेश दिले आहे.

‘न्यूड’ हा सिनेमा मुंबईत गुप्तपणे न्यूड मॉडेलिंग करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित आहेत. ही अभिनेत्री कुटुंबापासून व तिच्या मुलापासून हे सत्य लपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते, अशी या चित्रपटाची कथा आहे.