शिवसेना, आप, सपा आणि जदयूच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

बेंगळूरू : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व २७, ‘सपा’च्या २४, जनता दल संयुक्तच्या २८, आणि ‘आप’च्या २८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

शिवसेनेचे भाजपाशी फाटल्यापासून शिवसेना महाराष्ट्राशिवाय इतर राज्यात निवडणूक लढते आहे. याआधी उत्तरप्रदेश आणि गुजरातमध्येही शिवसेनेने हा प्रयोग केला आणि सपाटून मार खाल्ला .

‘आप’चे ही असेच सुरू आहे. दक्षिण भारतातील चेहारा असलेले पृथ्वी रेड्डी यांना केवळ १ हजार ८६१ मते मिळाली. याआधी गुजरातमध्ये देखील आपची अशीच अवस्था झाली होती. या वर्षच्या शेवटी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्ष उमेदवार उभा करणार आहे. पण कर्नाटकमधील कामगिरीमुळे पक्ष दिल्ली आणि पंजाबच्या बाहेर वाढू शकणार नाही असे दिसत आहे.