डिलीट केलेली मीडिया फाईल करता येणार पुन्हा डाऊनलोड !

मंबई : व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड युझर्ससाठी आता एक नवीन फीचर आणले आहे. फोनमधून डिलीट झालेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड न होने ही सर्वात मोठी समस्या आता इतिहास जमा होणार आहे . फोनमधून डिलीट झालेल्या फाईल्स व्हॉट्सअॅपवर आता पुन्हा डाऊनलोड करता येतील. एखाद्या युझरने मोबाईलमधील फोटो, GIFs, व्हिडीओ, ऑडिओ किंवा एखादी डॉक्युमेंट फाईल डिलीट केली असेल तर ती व्हॉट्सअॅप सर्व्हरच्या मदतीने पुन्हा डाऊनलोड करता येईल. तुम्हाला जिथून ही फाईल आलेली असेल त्या चॅटमध्ये डिलीट केलेलीही फाईल परत मिळू शकेल.

यापूर्वी अँड्रॉईड युझर्स केवळ ३० दिवसांपर्यंतचा जुना डेटा डाऊनलोड करु शकत होते. सोबतच तुम्ही कुणीतरी पाठवलेली मीडिया फाईल डिलीट केली तर ती सर्व्हरवरुनही डीलिट होत असे. मात्र आता व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेल्या फाईल्सही परत उपलब्ध होऊ असतील.फाईल्स सर्व्हरवर ठेवल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे काळजी घेतली जाणार आहे. कारण, पूर्ण फाईल्स या एंड टू एंट एनक्रिप्टेड असतील.