मंगरूळपीर येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

मंगरुळपीर : तालुक्याच्या आसेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोन गावांत वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. शंकर माणिक चापळे आणि पुंजाजी सोनाजी कांबळे, अशी मृतकांची नावे आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर माणिक चापळे (४०) हे शेतात बक-या चारत असतांना ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वीज पडून त्यांचा मृत्यू झाला..वारा जहॉगीर येथील पुंजाजी सोनाजी कांबळे (६५) हे शेतात जात असतांना वीज पडून यामध्ये त्यांचा मृत्यु झाला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली.