दै. देशोन्नती कार्यालयास मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट

नागपूर: दैनिक देशोन्नती वृत्तपत्राच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धंतोली परिसरातील देशोन्नती कार्यालयास सदिच्छा भेट देऊन या दैनिकाचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे, अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मुख्यमंत्री यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर त्यांनी श्री. पोहरे यांच्या समवेत औपचारिक चर्चा केली. कार्यक्रमास दैनिक देशोन्नतीचे कार्यकारी संपादकीय संचालक ऋषिकेश पोहरे, संपादकीय प्रमुख राजेंद्र उट्टलवार, यांच्यासह उमेश सापधारे, लक्ष्मीकांत संगवई आदीं उपस्थित होते.