कार्पोरेटचे लोक सरकारमध्ये घुसवण्याचा प्रयत्न – राज ठाकरे यांची मोदी-शहावर टीका

मुंबई : नरेंद्र मोदी सरकारने नुकताच थेट कार्पोरेट क्षेत्रातील बड्या नोकरदारांना थेट सहसचिव (IAS अधिकारी) होता होईल असा निर्णय जाहीर करून सूचना, हरकती मागवल्या आहेत. मोदी सरकारचा हा निर्णय उद्योगपतींसाठी घेतला असून, मागच्या दाराने उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील लोक (कार्पोरेट) सरकारमध्ये घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दाखवले आहे. मात्र, जे हुशार विद्यार्थी अभ्यास करून, मेहनत करून स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी यावर नेमके बोट ठेवले आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यगंचित्राच्या माध्यमातून पुन्हा हल्लाबोल केला आहे. मोदी-शहांच्या पाठीमागे उद्योगपती लपल्याचे दाखवले आहे तर अशा लोकांचे स्वागत करण्यासाठी मोदी- शहा उतावीळ झाल्याचे दाखवले आहे तर दुसरीकडे, स्पर्धा परीक्षा सदेऊन उत्तीर्ण झालेले IAS अधिका-यांच्या उरावर हे बाहेरील लोक बसल्याचे दाखवले आहे.