खमंग ‘कॉर्न चीझ बॉल्स’

Corn

पावसाळ्यात  कांदा-बटाटा भजी, वडे, तळलेल्या कुरडया किवां मिरगुंड अशा खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू होते. पण, जर यापेक्षाही एखादा वेगळा पदार्थ ट्राय करायचा असेल तर अशांनी ‘कॉर्न चीझ बॉल्स’ अवश्य चाखून बघावेत.

साहित्य :- 

  • १ मोठा बटाटा
  • ३/४ कप मक्याचे दाणे (कॉर्न)
  • १/२ कप किसलेले चीझ
  • १/२ टीस्पून काळीमिरी
  • थोडा ओरेगॅनो
  • १/२ टीस्पून लसूण पेस्ट
  • ४ चमचे मैदा
  • मीठ चवीनुसार

कृती :- प्रथम एका कुकर मध्ये १ मोठा बटाटा व कॉर्न उकडून घ्या. उकडल्यावर बटाट्याची साली काढून बटाटा व कॉर्न एकत्र कुस्करून घ्या. आता यात किसलेले चीझ, काळीमिरी, थोडा ओरेगॅनो, १/२ छोटा चमचा लसूण पेस्ट एकजीव करा. चीझमध्ये मीठ असतं, त्यामुळे चिमूटभरच मीठ टाका. नंतर ४ चमचे मैदा टाकून एकत्र करा व त्यांचे छोटे-छोटे बॉल तयार करा. गॅस वर तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झाले की, त्यात हे बॉल मध्यम आचेवर तळा. आता हे बॉल टिश्शु पेपरवर काढून त्यातील अतिरिक्त तेल काढून टाका. हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा गरमागरम कॉर्न चीझ बॉल.