मित्रपक्षांना सोबत घेतल्यानेच काँग्रेस निवडणुका जिंकतील – धंनजय मुंडे

मुंबई : जेडीएस आणि काँग्रेस एकत्र येत लढले असते तर आजचे चित्र वेगळे बघायला मिळाले असते. त्यामुळे या निकालावरून असा निष्कर्ष निघतो की, की यापुढील काळात काँग्रेसला जर निवडणुका जिंकायच्या असेल, तर त्यांनी आपल्या सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवाव्या लागतील. असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते धंनजय मुंडे यांनी काँग्रेसला दिला आहे.

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल असे वातावरण निर्माण झाले होते, परंतु भाजपाने अनपेक्षितपणे विजय मिळवला आहे. लोकांमध्ये असलेल्या काँग्रेस सरकारविरोधातील भावना लक्षात न आल्याने भाजपाला विजय प्राप्त करता आला. पण यात जेडीएसने मोठी भूमिका बजावली आहे. जेडीएसमुळे मतांचे विभाजन झाले आणि भाजपाचा निसटता विजय झाला. जेडीएस आणि काँग्रेस वेगळे लढल्यामुळे त्यांना पराभव बघावा लागला. असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच पाकिस्तानातून आयातीत साखरेच्या मुद्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली. आज या देशामध्ये पाकिस्तान मधून साखर आयातीत करण्यात आली आहे, या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाचं उत्पादन घेतलं. आज त्या उसापासून मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन झाले आहे. ती गोडाऊन मध्ये पडून असताना पाकिस्तान मधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने घाट घातला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मोदीजी जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा पाकिस्तानला लव्हलेटर न लिहता ५६ इंचाची सीना दाखवावा लागेल अस म्हणत होते. आज तो ५६ इंचाचा सीना १२ इंचाचा झाला आहे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज पाकड्यांच्या हल्ल्यामुळे देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांचे रक्त सांडत आहे. तोच पाकिस्तान आज आपल्या देशात साखर पाठवतोय अन ती साखर आम्ही गोड म्हणून खायची का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या साखरे मध्ये देशातील लाखो सैनिकांचे रक्त आहे म्हणून आम्हाला एक कण ही साखर नको असेही ते म्हणाले.