काँग्रेसने आता नाव बदलवावे; शिवराजसिंह चौहान यांचे ट्विट

भोपाळ : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली कर्नाटक विधानसभेत भाजपा आपली सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. सातत्याने होणारा पराभव पाहता काँग्रेसने आपल्या नावात बदल करावा असा सल्लाच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी नावही सुचवले असून पाँडेचेरी, मिझोराम, पंजाब काँग्रेस (पीएमपी) असे पक्षाचे नामकरण करण्याचे सुचवले आहे. कर्नाटकचे निकाल आता समोर आले आहेत. आता अखिल भारतीय काँग्रेसला आपले नाव बदलून पाँडिचेरी, मिझोराम, पंजाब काँग्रेस (पीएमपी) केले पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

काँग्रेसची कर्नाटकातून सत्ता गेल्यात जमा आहे. सध्या काँग्रेसची पाँडिचेरी, मिझोराम आणि पंजाब या तीन राज्यातच सत्ता आहे. त्यामुळे शिवराजसिंह यांनी काँग्रेसला हा उपहासात्मक सल्ला दिला.