काँग्रेसकडून गोवा-मणिपूरचा कर्नाटकात बदला ?

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत . भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी काँग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी करून सत्तेसाठी हालचाल सुरू केली. पण, याआधी गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीतही या पेक्षाही किचकट परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा भाजपने मोठ्या शिताफीने सत्ता स्थापन केली.

17 जागा मिळवून गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजप दुसऱ्या स्थानावर फेकले गेले. भाजपला 13 जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतासाठी 21 जागेचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत दोन्ही पक्षांना होती. भाजपने मगोप ३, गोवा फॉर्वर्ड ३ आणि २ अपक्षांना घेऊन २१ आकडा गाठत सत्ता स्थापन केली होती.

एकूण 60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभेमध्ये काँग्रेसला 28 जागा मिळाल्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या असताना बहुमतासाठी 31 आमदारांची आवश्यकता होती. भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी ( एनपीपी) आणि एलजेपी यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला. हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष होती. एनपीपीला 4 जागा आणि एलजेपीची 1 जागेच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या 26 जागा झाल्या. पण बहुमत सिद्ध करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता होती. अजून भाजपला 5 जागांची गरज होती. भाजपने नगा पिपल्स फ्रंटच्या समर्थनाचा दावा केला. त्यामुळे 5 जागांचाही व्यवस्था झाली. त्यानंतर काँग्रेसचा एक आमदार आणि तृणमूल काँग्रेसचा एकमेव आमदारही भाजपच्या गळाला लागलाय. त्यामुळे भाजपने 32 जागांवर दावा ठोकला होता.