कॉंग्रेस आणि जेडीएस ५ वाजता राज्यपालांना भेटणार

बेंगरूळू : कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेस यांच्या पैकी कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने दोन्ही पक्षाची मोठी दमछाक होतांना दिसत आहे. कॉंग्रेसच्या १२ आणि जेडीएसच्या २ उमेदवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे या खेळात एकदमच ‘ट्वीस्ट’.

आता या पाठोपाठ आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे; काँग्रेस आणि जेडीएसचे नेते आज ५ वाजता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना भेटणार आहेत. या बाबतचे सर्व अधिकार राज्यपालांकडे राखीव असून आता नेमकी विजयमाला कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहण्यासारखे असेल.