मराठी बिग बॉस विरुद्ध नाशिकमध्ये तक्रार दाखल !

नाशिक : कलर्स मराठी वाहिनीवर अति कमी काळात प्रसिद्ध झालेला रिअॅलिटी शो ‘मराठी बिग बॉस’ वादात सापडला आहे. बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्याविरोधात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी बिग बॉसविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचं आहे.हे दोघेही विवाहित असतांना त्यांचे असे वर्तन हे अतिशय वाईट असून, बिग बॉस हा शो विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

यादरम्यान, ऋषिकेश देशमुख यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कलर्स वाहिनीचे संचालक, निर्माते आणि दोन्ही कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.