स्वच्छता पंधरवाडयात अकोला येथील ‘सीएससी’ प्रथम

swach bharat

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने दिनांक १ ते १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ स्वच्छता पंधरवाडयाचे देशभर आयोजन करण्यात आले. याकाळात देशभरातील कॉमन सर्विस सेंटर्सच्यावतीने स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात आला. महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी अकोला येथील उमरी भागातील ‘दिलासा- कॉमन सर्विस सेंटर’ राज्यातून प्रथम ठरले. कार्यक्रमात या केंद्राचा सत्कार करण्यात आला. सेंटरच्या संचालिका प्रतिभा काटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लॅपटॉप, प्रोजेक्टर आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गोंदिया येथील कॉमन सर्विस सेंटरला द्वितीय पुरस्कार मिळाला सेंटरचे प्रमुख राजकुमार असाटी यांनी पुरस्कार स्वीकारला. आरोग्य निदान किट आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील म्हसुरने गावातील कॉमन सर्विस सेंटरला  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सेंटरच्या प्रमुख माधुरी पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मार्टफोन आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.