बलात्कार करून बालिकेची हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये ८ वर्षांच्या असिफावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरुद्ध सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

१० जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर अमानूष अत्याचार केले आणि नन्तर तिची हत्या केली. दरम्यान १२ जानेवारीला असिफाच्या नातेवाईकांनी, पोलिसात असिफा बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

१७ जानेवारीला जंगलात असिफाचे प्रेत कुजलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. घट्नेनंतर मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम दोन महिने फरार होता. मार्चमध्ये तो स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली.

दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्यानं देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. जम्मू बार असोसिएशनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईविरोधातच निदर्शनं केली. या बार असोसिएशनने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली.

दिग्गज आक्रमक
प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सोनम कपूर, रेणुका शहाणे, फरहान अख्तर, जावेद अख्तर, रितेश देशमुख, टेनिस स्टार सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांसह अनेक दिग्गजांनी ट्वीटरवरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.