चेहरा धुतांनी घ्या अशी काळजी..

face wash

चेहरा धुतल्यानंतर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं. काही लोकांचे असे मत आहे की, चेहरा जास्त घासल्याने रंग गोरा होतो. पण हा विचार डोक्यातून काढून टाका कारण जास्त घासल्याने चेहऱ्यावर परिणाम होतो. जर तुम्ही मेकअप, सनस्क्रीन व अन्य कुठले लोशन लावलेले नाही तर मग चेहरा केवळ पाण्याने धुतला तरी चालेल. अशावेळी क्‍लिझिंग एकदाच करावे व रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. क्‍लिंझरची निवड काळजीपूर्वक करावी. कारण त्याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे क्‍लिंझर हे खूप स्ट्रॉंग असू नये व खूप सौम्यही असू नये.

चेहरा आपल्या शरीराचा एक नाजूक भाग आहे. शरीराची जशी स्वच्छता आवश्यक आहे तशीच चेहऱ्याची देखील आहे. कधीही घाईघाईने चेहरा धुवू नये. घाईघाईने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर केमिकल्स तसेच राहतात व चेहऱ्यावरील छिद्रे बुजतात. परिणामी त्वचा कोरडी पडते. अशावेळी कितीही वेळ लागला जरी आळस न करता चेहरा नीट स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावरील डेड सेल्स निघुन जाण्यासाठी तुम्ही स्क्रबिंगचा उपयोग करू शकता. स्क्रबिंगसाठी कापूस किंवा कपडयाचावापर न करता बोटांचा वापर करावा. मात्र आठवडयातून केवळ दोन किंवा तीन वेळा स्क्रबिंग करावे. त्यापेक्षा जास्त केल्यास त्वचेचे नुकसान होते. तसेच चेहरा पुसायला नेहमी सुती कापडाचा वापर करावा. शक्यतो दुसऱ्याचा टॉवेल किंवा कापड वापरू नये.याने जंतूसंसर्ग होण्याची भीती असते. या शिवाय कुठला हि फेस वाॅश किंवा साबून वापरण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले राहील.